जनतेला न्याय मिळवून देत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी स्वस्थ बसणार नाही – खा. सुप्रिया सुळे

11 Dec 2017 , 08:42:44 PM

महाराष्ट्रातील आणि विदर्भातील जनतेला जोपर्यंत न्याय मिळवून देत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही कार्यकर्ता स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही खासदार सुप्रिया सुळे यांनी सेलडोह येथे झालेल्या सभेत दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची #हल्लाबोल पदयात्रा नवव्या दिवशी खडकी गावातून निघाली. पुढे सेलडोह गावातील चौकामध्ये सभा पार पडली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी गरीब शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, जीएसटी, नोटबंदी, कर्जमाफी असे सगळे गंभीर विषय घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हल्लाबोल करत असल्याचे सांगतिले. तसेच १२ डिसेंबरला सरकारला जाब विचारण्यासाठी जनतेने सहभागी होण्याचे आवाहन केले.

सभेच्या ठिकाणी केळी बागायतदार गीताबाई झांडे, पंकज झांडे यांनी खा. सुप्रिया सुळे यांना निवेदन दिले. त्या शेतकऱ्यांनी न्याय मिळवून देण्याची मागणी केली.

यावेळी माजी मंत्री जयंत पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री भास्कर जाधव, माजी मंत्री गुलाबराव देवकर, आमदार राणा जगजीत सिन्हा पाटील, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, ओबीसी सेलचे राज्यप्रमुख ईश्वर बाळबुधे, आमदार विदया चव्हाण, आमदार भाऊसाहेब पाटील, माजी आमदार सुरेश देशमुख, वर्धा जिल्हाध्यक्ष सुरेश राऊत, महिला जिल्हाध्यक्षा शरयू वांदिले, यवतमाळ जिल्हाध्यक्ष नानाभाऊ गाडबैले, जिल्हाध्यक्षा क्रांती धोटे-राऊत, प्रवक्ते महेश तपासे आदींसह असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

या सभेनंतर हल्लाबोल पदयात्रेने नागपूरमध्ये प्रवेश केला. त्यावेळी पदयात्रेला माजी मंत्री अनिल देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठया संख्येने सहभागी होत पदयात्रेचे स्वागत केले.

संबंधित लेख