सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांचा नागपूर प्रवेशद्वाराजवळ हल्लाबोल

11 Dec 2017 , 08:52:09 PM

आज खापरी येथून सुरू झालेल्या पदयात्रेचे नागपूर शहराच्या प्रवेशद्वारावर रास्तारोको आंदोलनात रूपांतर झाले. या आंदोलनावर पोलिसांनी कारवाई करत खा. सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांना ताब्यात घेतले व नंतर सोडून दिले. दरम्यान, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी तसेच हल्लाबोलच्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून टाकला. पोलिसांनी सोडून दिल्यानंतर #हल्लाबोल पदयात्रा पुन्हा सुरू करण्यात आली.

संबंधित लेख