सरकारने ग्राहकांबरोबरच दूध उत्पादकांचाही गांभीर्याने विचार करावा : आ. जितेंद्र आव्हाड

18 Dec 2017 , 08:26:36 PM

आज राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना २७ रू. प्रति लिटर दर देण्याच्या सरकारच्या निर्णयावरून विरोधकांनी सभागृहात तोडगा काढण्याची मागणी केली. सहकारी दूध संघांना हा दर परवडत नाही. सरकारने ग्राहकांचा विचार करतानाच उत्पादकांचाही गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे, असे मत आ. जितेंद्र आव्हाड यांनी मांडले. ग्रामीण - शहरी असा संघर्ष उभा करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असा आरोपही त्यांनी केला. लहान दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय करून सरकार दुधाची अर्थव्यवस्था मोडकळीस आणत आहे. निदान दुधात तरी सरकारने राजकारण करू नये, असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले.

संबंधित लेख