सरकारला शेतकरी नष्ट व्हावा, असं वाटतं का? : अजित पवार

19 Dec 2017 , 12:09:09 AM

आज सभागृहात कर्जमाफी आणि बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीचा स्थगन प्रस्ताव विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी दिला. मात्र अध्यक्षांनी बोंडअळीची लक्षवेधी पुढे ढकलली. अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या भागात शेतकरी बोंडअळीने त्रस्त आहे. त्यामुळे यावर चर्चा व्हायलाच हवी आणि सरकारने यावर उत्तर द्यायलाच हवे.

कर्जमाफीबाबत राज्यातील प्रमुख मंत्री वेगवेगळ्या स्टेटमेंट देत आहेत. पण शेतकऱ्यांना दिलासा नाही. बोंडअळीबाबतच्या मदतीचे काय झालेपिकांच्या हमीभावाचे काय झाले?मंत्र्यांना विषयाबाबत माहिती मिळत नाही म्हणजे अधिकाऱ्यांवर सरकारचे नियंत्रण नाही. सरकारने यावर चर्चा करायला हवी. या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा का केली जात नाही?सरकार कुणाला पाठिशी घालतंयसरकारला शेतकरी नष्ट व्हावा असं वाटतं का?, असा सवाल त्यांनी केला.

संबंधित लेख