'कॉलेज तिथे राष्ट्रवादी' अभियानाअंतर्गत शाखा उदघाटनाच्या समारंभाला सुरुवात

13 Jan 2018 , 09:09:46 PM

राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसमार्फत 'कॉलेज तिथे राष्ट्रवादी' या अभियानाअंतर्गत शाखा उदघाटनाच्या समारंभाला सुरुवात केली. यावेळी विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी व न्यायासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस सदैव विद्यार्थ्यांसोबत असेल अशी ग्वाही विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. अजिंक्यराणा पाटील यांनी दिली.

या अभियानाअंतर्गत श्री शाहू महाविद्यालय पर्वती, जेधे महाविद्यालय, मुक्तांगण महाविद्यालय, पूना कॉलेज आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठ येथे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचा आवाज उठवण्यासाठी शाखा सुरू करण्यात आल्या. यावेळी अखिल भारतीय मराठा शिक्षण संस्थेच्या सरचिटणीस मा. प्रमिलाताई गायकवाड, पुणे मनपा नगरसेवक मा.सुभाष जगताप, शहराध्यक्ष ऋषिकेश परदेशी, प्रदेश उपाध्यक्ष संकेत ढवळे यांसह अनेक पदाधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन सरचिटणीस श्रीनिवास जगताप यांनी केले होते.

संबंधित लेख