महाराष्ट्रातील एकमेव महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठावर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा झेंडा !

20 Jan 2018 , 06:25:24 PM

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसला राज्यात मोठं यश लाभलं आहे. ज्या विद्यापीठाअंतर्गत राज्यभरात ३५० वैद्यकीय महाविद्यालय आहे अशा संस्थेवर काम करण्याची संधी राष्ट्रवादीला प्रथमच एक हाथी मिळाली. पुढील काळात विद्यार्थी आणि विद्यापीठ यांच्यातील सुसंवाद व्यवस्थित राहील व विद्यार्थी हिताचे निर्णय या माध्यमातून घेतले जातील. विद्यार्थीच्या मागण्यांना न्याय मिळवून दिला जाईल असे प्रतिपादन मा. अजिंक्यराणा पाटील यांनी विजयी उमेदवारांच्या सत्कार प्रसंगी केले.

यावेळी आ.जयंत जाधव, मनपा गटनेते गजानन शेलार, नाशिक शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश उपाध्यक्ष संकेत ढवळे, सरचिटणीस श्रीनिवास जगताप, चिटणीस श्रेयांस सराफ विद्यार्थी जिल्हाध्यक्ष नंदन भास्करे, शहराध्यक्ष गौरव गोवर्धने, आकाश कदम यासह इतर पदाधिकारी व वैद्यकीय विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

संबंधित लेख