राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष घेणार पक्षांतर्गत निवडणुका

30 Jan 2018 , 09:30:09 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीने राज्य निवडणूक अधिकारी म्हणून माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांची नियुक्ती केलेली असून त्यांनी पक्षांतर्गत निवडणूक २०१८-२०करिता निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमांतर्गत ११ फेब्रुवारीला प्राथमिक कमिटी / मतदान केंद्रनिहाय कमिटीची निवडणूक तेथील पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य यांच्यासाहित घेतली जाईल. १८ फेब्रुवारीला पंचायत निवडणूक / शहर किंवा विभागीय कार्यकारिणी निवडणुका तेथील अध्यक्ष व अन्य पदाधिकारी यांच्यासाहित ब्लॉक / तालुका वर निवडून जाणाऱ्या प्रतिनिधींच्या निवडणुका घेतल्या जातील. २५ फेब्रुवारीला विधानसभा मतदारसंघ निहाय तसेच तालुका / ब्लॉक कार्यकारिणी / अध्यक्ष व अन्य पदाधिकारी यांच्यासाहित तसेच जिल्हा वर पाठविणारे प्रतिनिधी त्याचबरोबर प्रदेश वर पाठविण्यात येणारे प्रतिनिधी यांची निवडणूक होईल. ४ मार्च रोजी जिल्हा कार्यकारिणी अध्यक्ष व अन्य पदाधिकारी यांची निवडणूक होईल. ११ मार्चला मुंबई विभागीय कमिटीचे अध्यक्ष किंवा अन्य पदाधिकारी यांच्यासाहित कार्यकारिणी निवडणूक घेण्यात येईल. तर १८ मार्चला राज्याची कार्यकारिणी, अध्यक्ष व अन्य पदाधिकारी तसेच राज्य निवडणूक मंडळावर जाणारे प्रतिनिधी, राष्ट्रीय परिषदेवर राज्यातून पाठविण्यात येणाऱ्या प्रतिनिधींची निवडणूक होईल.

संबंधित लेख