जामनेरच्या हल्लाबोल सभेत पवार साहेबांची ‘व्हर्च्युअल’ हजेरी

23 Feb 2018 , 07:44:05 PM

जामनेर येथील अठराव्या हल्लाबोल सभेचे वैशिष्ट्य म्हणजे पवार साहेबांनी या सभेला मोबाइल फोनद्वारे ‘व्हर्च्युअल’ हजेरी लावली.

खासदार सुप्रियाताईंनी त्यांच्या फोनमधून डायरेक्ट साहेबांना व्हिडियो कॉल लावला होता आणि मग उपस्थित मोठा जनसमुदाय पवारसाहेबांना दिसावा म्हणून त्यांनी जनतेसमोर हा मोबाइल धरला. त्यानंतर एकच जल्लोष उडाला. प्रत्यक्ष शरद पवार या सभेत आपल्याला पाहतायत हा आनंद लोकांच्या चेहऱ्यावर दिसत होता.

सुप्रियाताईंच्या या कृतीने या सभेचा नूरच पालटून गेला. या आधी थोडा काळ सभेत काही घुसखोर गटांनी विरोधातल्या घोषणा द्यायला सुरुवात केली होती. राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी त्याला प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली. त्यामुळे परिस्थिती थोडी तंग झाली होती. आधीच रॅलीच्या वेळी स्ट्रीटलाइट बंद करण्यात आल्याचा लोकांना राग होता. मात्र पवारसाहेब व्हर्च्युअल सभेला आले म्हटल्यावर त्या जल्लोषात विरोधातली घोषणाबाजी विरून गेली.

संबंधित लेख