संग्राम कोते पाटील यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा

18 Jan 2016 , 03:54:49 PM

नाशिक येथे राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेस उत्तर महाराष्ट्रतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्या नेतृत्वाखाली नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. 

या मोर्चातील मागण्या-

उत्तर महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ व्हावे

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या मदतीआड येणाऱ्या जाचक अटी दूर व्हाव्या

ओबीसी, वीजेएनटी आणि एसबीसी या गटातील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपचा लाभ मिळण्यासाठी उत्पन्न मर्यादा वाढवावी

विद्यार्थ्यांच्या जात पडताळणी प्रमाणपत्राचे काम दोन महिन्यांत व्हावे.

आदिवासी वसतीगृहांची क्षमता वाढवावी

अॅग्रीकल्चरल कॉलेजच्या राज्यातल्या ७० कोटींच्या पेंडिेग स्कॉलरशिप्स तसेच मेडिकल कॉलेज, डेंटल कॉलेजेस, बी.एच.एम.एस. यांच्या २०१४-१५ च्या पेंडिंग स्कॉलरशिप्स संदर्भात निर्णय घ्यावा

संबंधित लेख