चित्राताई वाघ यांचा रत्नागिरी जिल्हा दौरा वृत्तांत

19 Jan 2016 , 10:12:35 AM


राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांचा रत्नागिरी जिल्हा दौरा वृत्तांत- 

देवरूख तालुका-
 काम कठीण आहे पण अश्यक्य नाही. जिल्ह्यात एका ठिकाणी बसून जिल्ह्याचे काम होणार नाही,मी ही मुंबईत बसून महाराष्ट्राचा कारभार नाही करू शकत. तुम्हालाही फिरावे लागणार आहे,जिल्हाध्यक्षांनी तालुक्यात,तालुकाध्यक्षांनी गावागावात पोहोचायला हवे. तालुकाध्यक्षांच्या खाली काही पदच नाहीय,प्रत्येक गावात एक गावप्रमुखाचे पद निर्माण करा, गावागावात घडणाऱ्या प्रत्येक घटना तुमच्या पर्यंत पोहोचायलाच हव्यात त्यासाठी शेवटच्या बाईपर्यंत तुम्हाला पोहोचावेच लागेल

चिपळूण तालुका-
या भाजपा सेनेच्या सरकारचे अच्छे दिनचे वादे कसे फोल ठरले आहेत हे आपण पहातोच आहोत. आज प्रत्येक जीवनावश्यक वस्तू महाग झालीय.भाज्या, डाळी सगळचं इतकं महागलयं की जगणं महाग आणि मरणं स्वस्त अशीच परिस्थिती या सरकारने आपल्यावर आणली.या सरकारचा हा खोटेपणाचा बुरखा फाडून त्याचं खरं रूप जनते समोर आणण्याचे काम आपल्यालाच करायचे आहे मैंत्रिणींनो.म्हणूनच जनसामान्यांपर्यंत पोहोचा आणि जिथे मिळेल तिथे या फेकूंना ठोकून काढा 

गुहागर तालुका-
आपण सत्तेत  असताना अजितदादा,आबा आपले सगळेच नेते सकाळी ७ वाजताच पक्ष कार्यालयात यायचे,जनता दरबार भरायचा ,येणा-या प्रत्येक व्यक्तीचे काम  होत होते.त्यांनी त्यावेळी आलेला माणूस कुठल्या पक्षाचा ,कुणाचा आहे याचा विचार न करता त्यांची काम केली.पण त्यांनी केलेली कामं आपण कार्यकर्ते लोकांपर्यत पोहोचवायला कमी पडलो. बोटभर कामांची हातभर प्रसिध्दी करणारे हे सरकार अनेक बाबीत कमी पडलयं.त्यांचा नाकर्तेपणा  आणि आपल्या सरकारने केलेल्या कामांची जनतेला आठवण करून द्यायला लागा,लोकांपर्यंत पोहोचा,आपला जनसंपर्क वाढवा.

खेड तालुका-
महिलांचे छोटे छोटे प्रश्न आहेत.ते ओळखणे तुम्हा आम्हा महिलांना कठीण नाही.ते ओळखून तिचा प्रश्न सुटेपर्यंत तिच्या सोबत रहा,तिला बळ द्या.ती महिला तिच्या कुटुंबासह तुमच्याशी जोडली जाईल. आज ही संक्रांत महिलांवर -लहान मुलींवर आलेली आहे.त्याबद्दल महिलांमध्ये जागृती करा.सगळीकडे महिलांपर्यंत तुमचा आमचा राष्ट्रवादीचा सुरक्षेचा तिळगुळ पोहोचवा 

दापोली तालुका-
ज्यावेळी आदरणीय पवार साहेबांनी ५०% आरक्षणाचा मुद्दा मांडला असेल तेव्हां तुम्हाला काय वाटतं सगळ्यांनी हसत-हसत या गोष्टीला मान्यता दिली असेल? त्यांनाही प्रचंड विरोधाचा सामना करावा लागला असेल.मुठभर बायकांनी पुढे यावं म्हणून साहेबांनी हे आरक्षण आणले नाही तर समाजातील प्रत्येक महिला सक्षम व्हावी,सबल व्हावी हा साहेबांचा उद्देश होता. पाळण्याच्या दोरीसोबतच त्यांनी झेंड्याची दोरीही आपल्या हाती दिली,आपल्याला सक्षम केले मात्र फक्त आरक्षणामुळे आपण इथे नाही आहोत हे आपल्याला सिध्द करायचे आहे.त्यांनी आपल्यावर दाखवलेला विश्वास आपल्याला सार्थ करायचा आहे. ज्यावेळी समाजातली शेवटची महिला सक्षम होईल त्यावेळी साहेबांनी आपल्यासाठी बघितलेले स्वप्न नक्की पूर्ण होईल.

मंडणगड तालुका-
महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी आपल्याला शिक्षणाची कास दिली,आंबेडकरांनी १९५२मध्ये कोड बील आणून आपल्याला मतदानाचा अधिकार दिला.मैत्रीणींनो आजही कित्येक देशात महिलांना मतदानाचे अधिकार नाहीत ही वस्तूस्थिती आहे.आम्ही महात्मा फुलेंना ,आंबे़डकरांना पाहीले नाही परंतू त्याचा वसा-वारसा चालवणा-या पवारसाहेबांना पाहीलय. अगोदर ३३% आणि नंतर ५०% आरक्षण महिलांना देऊन आदरणीय साहेबांनी हा वारसा सिद्ध केला आहे आता आपल्याला त्यांनी दाखवलेला विश्वास सार्थ करायचा आहे

संबंधित लेख