येत्या ६ मे पासून हल्लाबोल आंदोलनाचा पाचवा टप्पा कोकणात सुरू होणार आहे. ६ व ७ मे पालघर, ११, १२, १३ मे ठाणे आणि १ ते ५ जून सिंधुदुर्ग, रायगड येथे असेल. ग्रामपंचायत निवडणुकांमुळे हे आंदोलन टप्प्याटप्प्यात करण्यात येत आहे, अशी माहिती आज प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. हल्लाबोल आंदोलनाच्या दौऱ्याबाबत आज मुंबईत पत्रकार घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
या खोटारड्या आणि फेकू सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पश्चिम महाराष्ट्रात चौथ्या टप्प्याचे आंदोलन केले. कोल्हापूरपासून सुरू झालेल्या या दौऱ्यात ३८ ठिकाणी सभा झाल्या. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र या परिसरात जसा प्रतिसाद मिळाला तसाच प्रतिसाद पश्चिम महाराष्ट्रातही लाभला. तरुण वर्ग, महिला वर्ग रस्त्यावर उतरला होता. या आंदोलनाच्या माध्यमातून लोकांचा सरकारविरोधात रोष आणि संताप दिसून येत होता, असे त्यांनी नमूद केले.
आतापर्यंत आंदोलनाच्या माध्यमातून ८८ च्या वर सभा झाल्या. गिरीश महाजन म्हणतात की हल्लाबोल आंदोलनाबाबत आम्हाला माहिती नाही. त्याबाबत एकही निवेदन मिळाले नाही. सर्व प्रांताध्यक्षांना, तहसीलदारांना याबाबत निवेदन दिले आहे. हल्लाबोल आंदोलनादरम्यान देण्यात आलेली निवेदने मंत्रालयात पोहोचली नाहीत, असे गिरीश महाजन म्हणत असतील, तर मंत्रालय आणि स्थानिक पातळीवर संवाद नाही हे यातून दिसून येते. राज्यात भाजप बॅकफूटवर आहे. पोटनिवडणुका झाल्या. त्यात भाजपला जास्त प्रतिसाद मिळाला नाही. शहरांमध्ये भाजप तिसऱ्या क्रमांकावर आहे. २०१९ साली जनता आमची दखल घेईल आणि या सरकारला बेदखल करेल, अशी खात्री त्यांनी व्यक्त केले.
मोठा गाजावाजा करत या सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. मात्र, कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांना झाला नाही. मेक इन महाराष्ट्र, मॅग्नेटिक महाराष्ट्र या उपक्रमांच्या माध्यमातून ८ लाख कोटींची गुंतवणूक होईल, असे सरकारतर्फे सांगितले गेले होते. मात्र झाले काहीच नाही. मोठ्या जाहिराती करून सरकारने फक्त स्वतःची पाठ थोपटून घेण्याचे काम केले. अंगणवाडी सेविकांना ‘मेस्मा’ लावण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने हाणून पाडला. त्यामुळे त्यांच्या मनात राष्ट्रवादीबाबत सहानुभूती आहे. एसटीचे खासगीकरण होते की काय अशी भीती एसटी कर्मचाऱ्यांच्या मनात आहे. जिल्हा बँकांमध्ये नोकऱ्या उपलब्ध होत्या. त्या बाबतीत परीक्षाही घेतल्या गेल्या होत्या. मात्र, सरकारने ती भरतीही राजकीय हेतूने बंद केली. त्यामुळे सरकार सर्वच रिक्त पदे रद्द करणार आहे का? अशी राज्यातील बेरोजगार तरुणांच्या मनात भीती आहे, असे ते म्हणाले.
नाणार प्रकल्पाबाबत कोकणवासीयांची मोठी फसवणूक सरकारने केली आहे. आम्ही सरकारमध्ये असताना कोकणात रासायनिक प्रक्रिया करणारे प्रकल्प नकोत, अशी भूमिका आम्ही घेतली होती. पर्यावरण उद्ध्वस्त करणाऱ्या या प्रकल्पाला आम्ही आधीपासूनच विरोध करत आहोत. १० मे रोजी शरद पवार या प्रकल्पाच्या ठिकाणी भेट देतील. मुख्यमंत्री म्हणतात की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला या प्रकल्पाबाबत माहिती नाही. मुख्यमंत्र्यांनी हा सवाल शिवसेनेला विचारावा. फडणवीस म्हणतात हा प्रकल्प येथे झाला नाही, तर तो गुजरातला जाईल. यातून मुख्यमंत्र्यांचे गुजरात प्रेमच दिसते. येथील अनेक प्रकल्प येथून गुजरातला गेले आहेत. कोणाच्या भीतीमुळे हे प्रकल्प गुजरातला जात आहेत, ते स्पष्ट व्हायला हवे, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी प्रमुख प्रवक्ते नवाब मलिक, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, प्रवक्ते संजय तटकरे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
कळंब, यवतमाळ - मुख्यमंत्र्यांनी हल्लाबोल पदयात्रेवर टीका केली. आमच्यावर टीका करण्याआधी मुख्यमंत्री महोदयांनी शेतकऱ्यांच्या मालाच्या भावाचे बोलावे. मी महिला म्हणून मुख्यमंत्र्यांना आव्हान देते की मुख्यमंत्र्यांनी कळंबमध्ये यावे आणि माझ्याशी वाद घालावा, असे आव्हानच त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. अंगणवाडी सेविकांनी कधी राज्यात आत्महत्या केली नव्हती, पण आज त्यांच्यावर मोठे संकट कोसळले असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. #हल्लाबोल पदयात्रेच्या दुसऱ्या दिवशी त्या बोलत होत्या.नरेंद्र मोदी यांच्या सर ...
पुढे वाचाकाबाडकष्ट करणाऱ्या विधवा महिलेस विहीरीसाठी अनुदान मिळावे यासाठी विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांचा पुढाकार घेतला. संगीता काळे ही काबाडकष्ट करणारी विधवा महिला शेतकरी. अवघी दोन एकर जमीन, तीन मुलं, आजारी दिर असा परिवार. सरकारी अनुदानातून खूप आधी विहिरीची मागणी केली होती. तिची मागणी तिच्या शिवारातूनच फोन लावून जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्यापर्यंत पोहोचवली. ...
पुढे वाचासेलू येथून निघालेली पदयात्रा दर्गा शरीफ - केळझर असे टप्पे पार करत खडकी (नागपूर) येथे पोहचली. सेलू येथे सकाळी यशवंत महाविद्यालयच्या विद्यार्थ्यांनी कापूस व सोयाबिनचे पिक राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या हाती दिले. शेतमालाला भाव मिळत नसल्यामुळे आई-वडील त्रस्त असून आमचे गाऱ्हाणे सरकारपर्यंत पोहोचवा, अशी विनंती त्यांनी केली. वर्ध्यातील शेतमजूर महिलांनी गॅसच्या वाढलेल्या दरावरून रोष व्यक्त केला. आम्हाला सबसिडी नको तर गॅसच्या किमती कमी करा, अशी मागणी या शेतमजूर महिलांनी केली. आजही ठिकठिकाणी शेतकरी रस ...
पुढे वाचा