महिलांना सुरक्षा देण्यात सरकार अपयशी - संग्राम कोते पाटील

18 Apr 2018 , 08:06:39 PM

देशात अनेक ठिकाणी बलात्काराच्या घटना घडत आहेत. कठुआ आणि गुजरात येथील प्रकरणे हे त्याचे ताजे उदाहरण आहे. त्यामुळे युवकांचे प्रश्न सोडवण्यास हे सरकार अपयशी ठरलेच आहे मात्र महिला सुरक्षेचाही बोजवारा उडाला आहे अशी टीका संग्राम कोते पाटील यांनी केली. सरकारच्या निषेधार्थ लातूर येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा भव्य मोर्चा आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते.

राज्यात वाढत असलेली बेरोजगारी, फसलेली स्कील डेव्हलपमेंटची योजना, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या बंद असलेल्या शिष्यवृत्त्या, रोजगाराचे फसवे आश्वासन असे विविध विषय घेऊन राष्ट्रवादी युवक काँग्रेसने राज्यभर आंदोलन छेडले आहे. युवकांनी या मोर्चाला भरभरून पाठिंबा दिला.

यावेळी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील, युवक प्रदेश उपाध्यक्ष मेहबूब शेख, प्रदेश सरचिटणीस निशांत वाघमारे, युवक जिल्हाध्यक्ष चंदन नगराळकर, शहराध्यक्ष प्रवीण नाभडे आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख