दुष्काळाचे नामोनिशाण मिटवा, लागेल ती मदत करायला मी आहेच!; पवार साहेबांचा गावकऱ्यांना दिलासा

23 Apr 2018 , 10:36:14 PM

'दुष्काळाचे नामोनिशाण मिटवा, लागेल ती मदत करायला मी आहेच', असा दिलासा देणारे शब्द आज पवार साहेबांच्या तोंडून निघाले आणि गावकऱ्यांना धीर मिळाला. निमित्त होते ते माजी कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी माण आणि खटाव या दुष्काळग्रस्त भागात जलसंधारणाच्या कामासाठी दिलेल्या भेटीचे...

पवार साहेब सध्या खटाव या दुष्काळी तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. शेतकऱ्यांच्या सर्व समस्यांची जाण असणाऱ्या शरद पवार साहेबांनी वॉटरकप स्पर्धेतील सहभागी विविध गावांना भेटी दिल्या. त्यावेळी सरकारच्या कामावर अवलंबून न राहता मदत करण्याची ग्वाही देत त्यांनी गावकऱ्यांना धीर दिला.

इतकेच नव्हे, तर अवघ्या एका तासात साहेबांनी जलसंधारणाच्या कामासाठी पाच कोटींचा निधी उभारला. पवार साहेबांनी पुणे, मुंबई येथील संस्था, जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा बॅंकेचे चेअरमन शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना संपर्क करून मदत करण्याची विनंती केली. आणि पवार साहेबांच्या शब्दाची ताकद एका तासात दिसून आली. तसेच, संस्था आणि अनेक नेत्यांनी साहेबांच्या शब्दाला मान देत निधी दिला. यावेळी गावकऱ्यांनीही आपल्या जाणत्या राजाचे मन:पूर्वक आभार मानले.

संबंधित लेख