सरकार जनतेची दिशाभूल करत आहे - संग्राम कोते पाटील

04 May 2018 , 07:00:18 PM

राज्यात तरुणांचे असंख्य प्रश्न आहेत, सरकार या प्रश्नांकडे लक्ष देत नाही. उलट भलताच मुद्दा काढत जनतेची दिशाभूल करत आहे अशी टीका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी केली. बेरोजगारांचे असंख्य प्रश्न घेऊन राष्ट्रवादी युवक काँग्रेसने धुळे येथे भव्य मोर्चाचे आयोजन केले होते त्यावेळी ते बोलत होते.
राज्यात वाढत असलेली बेरोजगारीचा मुद्दा, फसलेली स्कील डेव्हलपमेंटची योजना, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या बंद असलेल्या शिष्यवृत्त्या, रोजगाराचे फसवे आश्वासन असे विविध विषय घेऊन राष्ट्रवादी युवक काँग्रेसने राज्यभर आंदोलन छेडले आहे. त्याच अनुषंगाने या मोर्चाचे आयोजन केले होते. युवकांनी या मोर्चाला भरभरून पाठिंबा दिला.

यावेळी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, धुळे महानगरपालिकेच्या महापौर कल्पना महाले, जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, प्रदेश सचिव सत्यजित सिसोदे, युवक जिल्हाध्यक्ष रणजित राजन भोसले, शहाराध्यक्ष कुणाल पवार आणि असंख्य तरुण कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख