ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या सुटकेनंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

05 May 2018 , 06:36:13 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची जामीनावर सुटका झाल्यानंतर मुंबई येथील प्रदेश कार्यालयात कार्यकर्त्यांकडून न्यायालयीन निर्णयाचे आनंदोत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी मुंबई अध्यक्ष निलेश भोसले, सचिव बाप्पा सावंत, मुंबई सरचीटणीस सचिन नारकर, युवा जिल्हाध्यक्ष उबेत साबरी, युवा जिल्हाध्यक्ष सुनील गिरी, कुलाबा तालुका अध्यक्ष शैलेन्द्र नाग युवा मुंबई सचिव सचिन शिंदे, मुंबई सहसचिव भालचंद्र शिरोळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी फटाके फोडून राष्ट्रवादी भवनात आनंद साजरा केला.

संबंधित लेख