सरकारच्या मुद्रा योजनेतील फोलपणा उघड

07 May 2018 , 10:06:36 PM

लहानपणी आपण ही कोल्हा व करकोच्याची गोष्ट ऐकलीच असेल. ज्यात करकोच्याला जेवणाचे आवतण देऊन धुर्त कोल्हा पसरट भांड्यात अन्न वाढतो जेणेकडून त्याला ते खाताच येणार नाही. मात्र जेवणाचे निमंत्रण दिल्याचा व जेवण वाढल्याचा मोठेपणा मात्र कोल्ह्याचा .. असंच काहीसं सध्या केंद्र सरकारकडून देशातील तरूणांच्या बाबतीत केले जात आहे. नेहमीप्रमाणे मोठा गाजावाजा करत जाहीर केलेल्या मुद्रा योजनेंतर्गत नवा व्यवसाय करण्यास उत्सुक असलेल्या तरूणांना बँकांकडून कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन सरकारतर्फे देण्यात आले. मात्र प्रत्यक्षात स्टार्टअपसाठी कर्ज दिल्यास ते वसूल करण्याची जबाबदारी संबंधित बँकेच्या व्यवस्थापकावर सोपावण्यात आल्याने कुठलाही अधिकारी कर्ज देण्याचा धोका पत्करण्यास तयार होत नाही. गेल्या आठवड्यात मुंबई येथे झालेल्या एसएमईच्या आर्थिक परिषदेत देशभरातून आलेल्या लघु उद्योजकांनी याबाबत नीती आयोगाच्या प्रमुखांना कर्ज मिळत नसल्याबाबत आपल्या तक्रारी मांडल्या. परंतु त्यांना आश्वासनापलीकडे काहीच मिळाले नाही.

मुद्रा योजनेद्वारे उद्योग उभारण्यासाठी दहा लाखांपर्यंत कर्ज देण्याची घोषणा करण्यात होती. परंतु याची हमी कोण घेणार, कर्ज कसे फेडले जाणार, याचा सरकारने काहीही विचार केला नाही. त्यामुळे सरकारच्या इतर अनेक फसव्या योजनांप्रमाणेच ही देखील योजना फसवी निघाली आहे. वरील गोष्टीत पुढे करकोचा कोल्ह्याला आपल्या घरी आमंत्रण देऊन उभ्या तोंडाच्या भांड्यात त्याला अन्न वाढतो. त्यावेळी फजिती झालेला कोल्हा पाहतच राहतो, त्याच प्रमाणे तरूणांना फसवणाऱ्या भाजपची पुढील निवडणुकांमध्ये देशातील हेच तरूण फजिती करतील, हे नक्की!

संबंधित लेख