जयंत पाटील यांनी केले पदाधिकाऱ्यांचेच क्रॉस व्हेरिफिकेशन

10 May 2018 , 06:54:31 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची काम करण्याची पद्धत कशी हटके आहे हे जगजाहीर आहे. नवीन प्रदेशाध्यक्षांच्या काम करण्याच्या निराळ्या पद्धतीचे दर्शन आज पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांनाही घडले. जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सांभाळल्यापासूनच अत्यंत धडाडीने आपल्या कामाची सुरुवात केली आहे. आज मुंबई येथील प्रदेश कार्यालयात जयंत पाटील यांनी युवा कार्यकर्त्यांची आढावा बैठक बोलवली होती. दरम्यान, आपल्या कामाची माहिती देताना पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांची यादी उपस्थितांसमोर मांडली. जयंत पाटील यांनी थोडाही वेळ न घालवता कार्यकर्त्यांना थेट फोन लावला आणि क्रॉस व्हेरिफिकेशन केले.
दरम्यान दहाऐवजी तीन पदाधिकारी जरी असले तर हरकत नाही, पण आपण स्वतःची फसवणूक करायला नको असे उद्गार त्यांनी काढले.

संबंधित लेख