सामाजिक कार्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा नेहमीच पाठिंबा – शशिकांत शिंदे

14 May 2018 , 06:31:14 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांच्या सूचनेप्रमाणे सातारा जिल्ह्यातील माण, खटाव आणि कोरेगांव तालुक्यातील पाणी फाउंडेशन वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या गावांना जिल्हा बँक, पवार चॅरिटेबल ट्रस्ट आणि जिल्हा परिषद यांच्या तर्फे आर्थिक मदत देण्यात आली. लोकांनी एकजूट दाखवून स्वखर्चातून हे काम केले, अशी माहिती आ. शशिकांत शिंदे यांनी दिली. दुर्दैवाने सरकारचा अपेक्षित पाठिंबा या योजनेस मिळत नसल्याची खंतही शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली. राज्य सरकारची मदत मिळाली नाही तरी लोकांनी एकजुटीने काम केले. लोकांची जिद्द आणि मेहनत पाहता या योजनेस पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मदत देण्याचा निर्णय घेतला. लोकांच्या या सामाजिक कार्यास आम्ही हातभार लावू शकलो यात आनंद असल्याची भावना शिंदे यांनी व्यक्त केली. 

संबंधित लेख