पाण्यासाठी आबांच्या पत्नी आ. सुमनताई पाटील यांचे नदीपात्रात उपोषण...

14 May 2018 , 06:56:06 PM

तासगांव कवठेमहाकांळ मतदारसंघातील येरळा नदीत पाणी सोडून या भागातील गावांना पिण्याचे आणि शेतीचे पाणी द्यावे, या मागणीसाठी माजी गृहमंत्री स्व. आर. आर. पाटील यांच्या पत्नी आमदार सुमनताई पाटील यांनी उपोषणाचे अस्त्र उपसले आहे. निमनी गावाजवळील येरळा नदी पात्रातच सुमनताई पाटील यांनी उपोषण केले. यावेळी त्यांच्यासोबत या भागातील शेतकरी, गावकरी देखील उपोषणाला बसले होते. येरळा नदीपात्रात पाणी न सोडण्यात आल्याने या भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. शेतीसाठीही पाण्याचा पुरवठा थांबला आहे. सातत्याने पाणी सोडण्याची मागणी करून देखील या मागणीकडे दुर्लक्ष केले गेल्याने आमदार पाटील यांनी आमरण उपोषणा करण्याचा पवित्रा घेतला.

संबंधित लेख