पाकिस्तानातून साखर आयात करणे ही भारतातील शेतकऱ्यांसाठी अडचणीची गोष्ट - दिलीप वळसे पाटील

14 May 2018 , 11:21:54 PM

यावर्षी भारतात मोठ्या प्रमाणात साखरेचे उत्पादन झाले आहे. जवळपास ३१९ लाख टन एवढी साखर यावर्षी निर्माण झाली आहे. गतवर्षीची शिल्लक साखर आणि यावर्षीची साखर याचा अंदाज घेतला तर साखरेचे प्रमाण खूप आहे. असे असताना सरकारने पाकिस्तानकडून साखर आपल्या देशात आयात केली आहे. ही भारतातील शेतकऱ्यांसाठी अडचणीची गोष्ट असल्याचे मत माजी विधानसभा अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी मुंबईत व्यक्त केले आहे.

मोठ्या प्रमाणात झालेल्या साखरेच्या उत्पादनामुळे आणि आंतरराष्ट्रीय बाजारातही मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या साखरेमुळे कारखान्यांना प्रति क्विंटल १००० रुपयांचे नुकसान होत आहे. साखर कारखानदारी आणि साखर शेतकरी अडचणीत आले आहेत. देशातील साखरेची निर्यात हाच यावरील एकमेव उपाय असल्याचे वळसे पाटील यांनी सांगितले. देशातील ७० ते ८० लाख टन साखर देशाच्या बाहेर गेली तरचत साखर कारखान्यांची परिस्थिती सुधारेल, असा उपाय त्यांनी सुचवला.

संबंधित लेख