राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच अल्पसंख्याक समाजाच्या पाठिशी – जयंत पाटील

14 May 2018 , 11:58:52 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी अल्पसंख्याक विभागाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी यांच्याशी संवाद साधला. यावेळी अल्पसंख्याक विभागातर्फे जयंत पाटील यांचा सत्कार करण्यात आला. 

महाराष्ट्रात येत्या दीड वर्षात विधानसभा निवडणूक होणार आहे. आपल्या प्रत्येकावरच एक मोठी जबाबदारी आहे. अधिकाधिक लोकांपर्यंत राष्ट्रवादीची कामे पोहोचविण्याचा प्रयत्न करा. अल्पसंख्याक समाजात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रचार व प्रसार कसा होईल यासाठी आपण काम करायला हवे, असे वक्तव्य पाटील यांनी केले. शरद पवार साहेबांनी नेहमीच अल्पसंख्याक समाजाचा विचार केला आहे. नव्या उद्योगांसाठी योजना आणल्या. सच्चर समितीबाबतीतही आदरणीय साहेबांनी सकारात्मक भूमिका घेतली. मी अर्थमंत्री असताना साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शंभर कोटींचा निधी अल्पसंख्याक समाजाला देण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कायम अल्पसंख्याक समाजाच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली आहे आणि भविष्यातही राहील, असे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष गफ्फार मलिक, सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष मुनाफ हकीम आणि पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख