प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत विदर्भ विभागाची आढावा बैठक संपन्न

16 May 2018 , 06:19:08 PM

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षांतर्गत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दि. १४, १५ व १६ मे २०१८ रोजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जिल्हा निहाय निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक अधिकारी यांच्या बैठका घेणार आहेत. १४ मे रोजी झालेल्या आढावा बैठकीवेळी पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे देखील उपस्थितीत होते. अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, नागपूर शहर, नागपूर ग्रामीण, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी जयंत पाटील यांनी संवाद साधला. मंगळवारी मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील संवाद साधतील. त्याप्रमाणे राज्यातील इतर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी टप्प्या टप्प्याने संवाद साधला जाईल, अशी माहिती पाटील यांनी दिली.

संबंधित लेख