राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंब्र्यात जोरदार शक्तीप्रदर्शन; तब्बल १०० कोटींच्या विकास कामांचे भूमीपूजन

16 May 2018 , 07:21:18 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मंगळवारी ठाण्यातील मुंब्रा भागाचा दौरा केला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते तब्बल १०० कोटींच्या विकास कामांचे भूमीपूजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार जितेंद्र आव्हाड, शहाराध्यक्ष आनंद परांजपे , ठाणे मनपातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक आणि पक्षाचे अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

जयंत पाटील यांच्या हस्ते २७ कोटींच्या नाल्याचे काम, २५ कोटींच्या रस्त्याचे काम, २१ कोटींच्या मुख्य रस्त्याचे काम, २७ कोटींच्या जलवाहिन्यांचे काम अशा विविध कामांचा शुभारंभ करण्यात आला. मुंब्रा येथील मुंब्रा प्रभाग समिती अध्यक्षा अनिता किणे, आशरीन राऊत, अशरफ पठाण (शानू), जमीला खान, बाबाजी पाटील, नादिरा सुरमे, सुलोचना पाटील, हसीना शेख, हफिजा नाईक, सिराज डोंगरे, सुनिता सातपुते, रुपाली गोटे, मोरेश्वर किणे, फरजाना शाकिर शेख, माजी नगरसेवक अमित सरैया, झफर नोमानी हे उपस्थित होते.

संबंधित लेख