आमदार फोडून घोडेबाजार करण्याची संधी भाजपला दिली जात असेल तर हे लोकशाहीचे दुर्दैव – जयंत पाटील

16 May 2018 , 09:08:28 PM

कर्नाटकात काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर यांना एकत्र सरकार स्थापन करण्याची संधी द्यायला हवी. कर्नाटक निवडणुकीच्या निकालानंतर तिथे उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीत कर्नाटकचे राज्यपाल न्याय करतील अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. एकत्रित सत्तस्थापनेचा जो निर्णय मणिपूरमध्ये लावण्यात आला तोच निर्णय कर्नाटकातही लावायला हवा असे मत त्यांनी वक्तव्य केले. अधिक वेळ दवडत भाजपला आमदार फोडून घोडेबाजार करण्याची संधी दिली जात असेल तर हे लोकशाहीचे दुर्दैव आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

भाजपचे अनेक नेते नाराज आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेस पार्टी भंडारा-गोंदिया, पालघर भागात एकत्र लढत असल्याचे जयंत पाटील म्हणाले. या दोन्ही जागा नक्कीच निवडून येतील यात काही शंकाच नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केल. पालघरमध्ये तर युतीतच बेबनाव आहे त्यामुळे पालघरची जागा नक्कीच निवडून येणार असल्याचे ते म्हणाले.

संबंधित लेख