राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकाऱ्यांच्या बैठका

18 May 2018 , 09:08:16 PM

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षांतर्गत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक अधिकारी यांच्या दि. १४ ते १६ मे या तीन दिवसात महाराष्ट्र प्रदेश कार्यालय येथे बैठका घेण्यात आल्या. या दरम्यान अमरावती, वाशिम, अकोला, बुलडाणा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, लातूर, हिंगोली, औरंगाबाद, जालना, नांदेड, नंदुरबार, धुळे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांतील पदाधिकारी बैठकांना उपस्थित होते. या बैठकींदरम्यान कोषाध्यक्ष हेमंत टकले, सरचिटणीस शिवाजी गर्जे हे देखील उपस्थित होते.

संबंधित लेख