प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माजी एटीएस प्रमुख हिमांशू रॉय यांना वाहिली श्रद्धांजली

21 May 2018 , 06:20:41 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माजी एटीएस प्रमुख, कर्तव्यदक्ष अधिकारी हिमांशू रॉय यांच्या शोकसभेस उपस्थित राहून कुटुंबियांचे सांत्वन केले. परिवेक्षणार्थी अधीक्षकापासून ते दहशतवादविरोधी पथकाच्या प्रमुख पदापर्यंतच्या प्रत्येक पोस्टिंगवर स्वत:ची आगळी छाप निर्माण करणारे कर्तबगार आणि धडाडीचे अधिकारी हिमांशू रॉय कर्करोगाची लढाई लढण्यात मात्र अपयशी ठरले. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्र पोलिस दलात निर्माण झालेली ही पोकळी भरून येणे कठीण आहे, अशी भावना जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

संबंधित लेख