खासदार वंदना चव्हाण यांनी ‘वॉटर कप’ प्रकल्पांतर्गत गावकऱ्यांसोबत केले श्रमदान

23 May 2018 , 06:23:47 PM

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांनी सोमवार, दि. २१ जून रोजी माण तालुक्यातील भांडवली आणि वाघमोडेवाडी या गावांना भेट देऊन गावकऱ्यांसोबत वॉटर कप प्रकल्पांतर्गत श्रमदान केले. “युवक, महिला, जेष्ठ नागरिक आणि बच्चेकंपनी यांच्यासह आपल्या गावाच्या भविष्यातील पाणीदार वाटचालीसाठी काम करणाऱ्या सर्वांना माझा सलाम!!” अशा शब्दांत आपल्या भावना खासदार वंदना चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केल्या. चव्हाण यांनी आपल्या खासदार निधीतून ५० लाख रूपयांची मदत देखील या प्रकल्पास जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील याआधी माण तालुक्यातील काही गावांना भेट देऊन गावकऱ्यांसोबत श्रमदानात सहभाग घेतला होता. तसेच प्रकल्पासाठी आवश्यकता असलेला सुमारे साडेसात कोटी रुपयांचा निधी अवघ्या अर्ध्या तासात उभारला होता. माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चाललेल्या ‘पानी फाऊंडेशन’ च्या वॉटर कप प्रकल्पाला राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीच सहाय्य केले आहे आणि भविष्यातही करत राहील, हेच वंदना चव्हाण यांनी आपल्या कृतीतून पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. 

यावेळी पुणे शहर युवती अध्यक्ष मनाली भिलारे, हर्षदा जाधव, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष बाळासाहेब सावंत,  पंचायत समिती सभापती रमेश पाटोळे पंचायत समिती सदस्य विजयकुमार मगर, डॉ. संदीप पोळ,  माजी जी. प. अध्यक्ष सुभाष नरळे, प्रशांत विरकर, भांडवली गावाचे सरपंच सुनिल सुर्यवंशी, माण तालुका पाणी फांऊडेशन समन्वयक अजित पवार तसेच वाघमोडेवाडी गावचे सरपंच दादासाहेब मडके, जिल्हा परिषद सदस्य भारती पोळ, पंचायत समिती सदस्य तानाजी कट्टे व ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित लेख