इंधन दरवाढीच्या विरोधात ठाण्यात राष्ट्रवादीचे तिरडी आंदोलन

23 May 2018 , 08:33:29 PM

कर्नाटकच्या निवडणुका संपल्यानंतर लागलीच पेट्रोल व डिझेलच्या दरात मोठया प्रमाणात वाढ करण्यात आली. मंगळवारी पेट्रोलचे दर ८५ रुपये झाले तर डिझेलचे दर ७३ रुपये झाले आहेत. सरकार महागाईला आळा घालण्यात अपयशी ठरत आहे, त्यामुळे अशा सरकारचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वात ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘तिरडी आंदोलन’ करण्यात आले. यावेळी तिरडीवर दुचाकीला झोपवून चक्क भाजप सरकारचे मडके फोडण्यात आले.

कर्नाटकमधील निवडणुकीनंतर सुरू असलेली इंधन दरवाढ मंगळवारीही कायम आहे. मंगळवारी मुंबईत पेट्रोलच्या किंमतीने उच्चांक गाठला असून पेट्रोलने लिटरमागे ८४.७३ रुपयांचा आकडा गाठला. तर डिझलेने लिटरमागे ७२.५३ रुपयांचा आकडा गाठला आहे. पेट्रोल व डिझेल महागल्याने इतर महागाई देखील वाढणार आहे. पेट्रोल- डिझेल दरवाढीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक होत भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत हे अनोखे आंदोलन केले. यावेळी तिरडीवर दुचाकी ठेवून जर अशीच भाव वाढ होत राहिली तर वाहनांना अशीच श्रद्धांजली अर्पण करावी लागेल, असे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नमूद केले. तसेच, या ठिकाणी आणलेले मडके हे मोदी सरकारचे मडके असल्याचे सांगून कार्यकर्त्यांनी हे मडके फोडले.

या आंदोलनात नगरसेवक सुहास देसाई, महेश साळवी,अशरफ पठाण (शानु), फ्रंटल व सेलचे अध्यक्ष कैलास हावळे, रमेश दोडके, राज राजापूरकर, रामदास खोसे, बाळकृष्ण कामत, प्रियांका सोनार, कार्याध्यक्ष नितीन पाटील, विजय भामरे, शहर कार्यकारिणी सदस्य/ब्लॉक अध्यक्ष /वॉर्ड अध्यक्ष-प्रभाकर सावंत, समीर पेंढारे, निलेश कदम, रत्नेश दुबे, कुलदीप तिवारी,हेमंत वाणी, दिलीप नाईक, तुळशीराम म्हात्रे, अरविंद मोरे, शरद कोळी, महेंद्र पवार, मयूर सारंग, राणी देसाई, सुमित गुप्ता, किशोर चव्हाण, बाळू नागरे, सचिन पंधरे, सुभाष आग्रे, समीर नेटके, राजू चापले, विशांत गायकवाड, सुधीर शिरसाठ, शिपून बेहरा आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख