कोण कोणाच्या भेटी घेते यावर मतदान अवलंबून नसते - जयंत पाटील

24 May 2018 , 09:48:00 PM

विधान परिषदेच्या निवडणुकांच्या सहा पैकी पाच जागांचा निकाल आज जाहीर झाला. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कोकणातली जागा अनिकेत सुनील तटकरे यांनी चांगल्या मताधिक्याने जिंकली, याबाबत त्यांचे अभिनंदन केले. तसेच, हे सुनील तटकरे साहेबांचे यश असल्याचे म्हणत त्यांनी कौतुक केले.

या निवडणुकांमधील तीन जागा राष्ट्रवादीने लढवल्या तर तीन जागा काँग्रेसने लढवल्या होत्या. नाशिकमध्ये आमचे संख्याबळ कमीच होते. त्यामुळे सहाणे यांनी प्रयत्न केले पण यश आले नाही यात आश्चर्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तर कोण कोणाच्या भेटी घेतं यावर मतदान अवलंबून नसतं त्यामुळे भुजबळ साहेबांनी मदत करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे म्हणत त्यांनी सर्व चर्चांना पुर्णविराम दिला.

संबंधित लेख