अन्यायकारी सरकारला आता 'चालते व्हा' म्हणण्याची वेळ आली आहे.

25 May 2018 , 11:05:58 PM

गेली चार वर्षे जनतेला केवळ भरडण्याचे काम भाजप सरकारने केले आहे. मोठमोठी आश्वासने देऊन ती पूर्ण करण्यात मात्र हे सरकार अपयशी ठरले आहे. सत्तेत आल्यापासून या सरकारने रोज नवनवीन घोषणा करून सर्वसामान्यांचे केवळ हाल केले आहेत. महागाई कमी करण्याच्या पोकळ बाता मारणाऱ्या या सरकारने प्रत्यक्षात मात्र जनतेचा खिसा कापला आहे. दिवसागणिक पेट्रोल व डिझेलची होत असलेली दरवाढ पाहता, लोकांनी गाड्या सोडून आता पायी चालतंच फिरावे की काय? जनतेची ही फरफट करणाऱ्या अन्यायकारी सरकारला आता 'चालते व्हा' म्हणण्याची वेळ आली आहे.

संबंधित लेख