नांदेडमध्ये राष्ट्रवादी युवक आक्रोश मोर्चा

28 May 2018 , 09:34:42 PM

सर्वसामान्य, कष्टकरी, गोरगरीब, दलित, अल्पसंख्याकांच्या असंतोषाला वाचा फोडण्यासाठी तसेच चुकीचे धोरण राबवून बेरोजगार व शेतकऱ्यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त करणाऱ्या राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात नांदेड शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी केले. यावेळी सरकार विरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली तसेच धरणे आंदोलन करुन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांना निवेदन देण्यात आले. या मोर्चात मोठ्या प्रमाणावर युवकांचा समावेश होता. या आक्रोश मोर्चाला युवक शहराध्यक्ष रउफ शेख जमीनदार, शहराध्यक्ष सुनील कदम आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख