'सुशासन आणि संवाद' पुस्तकाचे प्रकाशन

25 Jan 2016 , 09:09:59 PM

"शरद पवार म्हणजे जाणता राजा याचा प्रत्यय मला नेहमीच आला. स्वहितापेक्षा त्यांनी समाज आणि देशाच्या हिताला महत्व दिले आहे", असे केंद्रीय अर्थ सचिव विजय केळकर यांनी व्यक्त केले. आदरणीय शरद पवार यांच्यावर आधारित सुशासन आणि संवाद या पुस्तक प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी शरद क्रीडा मोबाइल अॅपही प्रतापराव पवार यांच्या हस्ते लाँच करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर सकाळ समुहाचे अध्यक्ष आणि आदरणीय शरद पवार यांचे बंधूप्रतापराव पवार, पुण्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे आणि शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे संस्थापक लक्ष्मीकांत खाबिया उपस्थित होते.

'एका मोठ्या पदावर पवार अध्यक्ष असताना ते पद पंतप्रधानांना दिल्यास देशहिताचे ठरेल, असे आपण जेव्हा पवार यांना घाबरत सांगितले, मात्र पवार यांनी देशाचे हित महत्त्वाचे मानत कोणताही विरोध न करता पद सोडून दिले', अशी आठवणही केळकर यांनी सांगितली.

कार्यक्रमात आदरणीय शरद पवार यांचे बंधू प्रतापराव पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सत्तेत असणाऱ्या लोकांद्दल बरं वाईट बोलले जाते. आदरणीय शरद पवार यांच्याबद्दल चुकीच्या गोष्टी बोलल्याचे आपण अनुभवले आहे. मात्र शरदरावांचे जवळचे लोक त्यांना चांगल्या प्रकारे ओळखतात. अशाच लोकांनी हे पुस्तक लिहिल्यामुळे त्यांचे चांगले पैलू या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांसमोर येतील, अशी आशा प्रतापराव पवार यांनी व्यक्त केली. 

सुशासन आणि संवाद या पुस्तकामध्ये आदरणीय शरद पवार यांच्यासोबत काम केलेल्या सचिवांनी आपले किस्से, आठवणी लिहिल्या आहेत. यांतील एक असणारे पवार साहेबांचे खासगी सचिव सतिश राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की, मी साहेबांसोबत काम करायला सुरुवात करताच एका दिवसात सेलिब्रेटी बनलो. त्यांच्याजवळच्या लोकांची ते नेहमीच काळजी घेतात. त्यांच्यासोबतच्या एवढ्या आठवणी आहेत की त्यावरही वेगळे पुस्तक निघू शकते.

पुस्तकाची मूळ संकल्पना आणि निर्मिती शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे संस्थापक लक्ष्मीकांत खाबिया यांची आहे. हे पुस्तक आदरणीय शरद पवार यांच्या जवळच्या लोकांनी लिहिले आहे. या पुस्तकात अशा काही आठवणी आहेत, ज्या आजपर्यंत लोकांच्या समोर आल्या नाहीत, अशी माहिती खाबिया यांनी दिली.

शरद क्रीडा या मोबाइल अॅपचेही लॉन्चिंग या कार्यक्रमात करण्यात आले. शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित केलेले सुशासन आणि संवाद, उद्यमशील आणि इंडस्ट्रियस ही तीन पुस्तके अॅपवर मोफत उपलब्ध आहेत. 

संबंधित लेख