पेट्रोलच्या दरवाढीविरोधात शहापूरमध्ये राष्ट्रवादी आक्रमक, आ. पांडुरंग बरोरा यांच्या नेतृत्वात करण्यात आले आंदोलन

29 May 2018 , 06:18:28 PM

शहापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आमदार पांडुरंग बरोरा यांच्या नेतृत्वात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढी विरोधात जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. जनतेचा आक्रोश या गेंड्याच्या कातडीच्या सरकारपर्यंत पोहोचावा व त्यांना जाग यावी म्हणून सामान्य जनता दररोज रस्त्यावर उतरत आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस जनतेसोबत या आंदोलनात सहभागी आहे, असे बरोरा यांनी सांगितले. 

संबंधित लेख