मुंबईत संविधान बचाव अभियानाचा कार्यक्रम होणार – फौजिया खान

30 May 2018 , 10:53:57 PM

संविधान बचाव अभियान देशभर राबवले जात असून या अभियाना अंतर्गत येत्या २० जून २०१८ रोजी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान यांनी दिली. बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस भवन मुंबई येथे महिला विभागाची आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. या संविधान बचाव कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार व इतर राष्ट्रीय नेतेही उपस्थित राहण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. यादरम्यान या कार्यक्रमानंतर पुढील आंदोलनाची दिशाही ठरवण्यात येईल. संपूर्ण महाराष्ट्रभरात प्रत्येक जिल्ह्यात हा कार्यक्रम घेण्यात येईल, असेही खान यांनी सांगितले. या आढावा बैठकीला आमदार विद्या चव्हाण, मुंबई अध्यक्षा सुरेखा पेडणेकर, आरती साळवी, स्वाती माने, सोनल वसईकर आणि अन्य महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

संबंधित लेख