आदरणीय शरद पवार यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज!

27 Jan 2016 , 05:31:31 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांना चार दिवसांच्या उपचारांनंतर आज सकाळी रुबी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. ते मुंबईकडे रवाना झाले.

पवार साहेबांना डॉक्टरांनी आठवडाभर विश्रांतीचा सल्ला दिला असला तरी माध्यमांशी बोलताना कार्यरत राहाण्याचीच सवय असणाऱ्या पवार साहेबांनी स्वतः मात्र आपल्याला पुढील दोन महिन्यांत एकही सुट्टी नसल्याचे सांगितले. आपल्याला एका जागी बसून राहायची सवय नसल्याचे सांगत 'आता विश्रांतीचं कसं करायचं ते बघू!' असे म्हटले.

आदरणीय पवार साहेबांची प्रकृती आता उत्तम आहे. विविध तपासण्यांसाठी त्यांना रुबी हॉस्पिटलमध्ये देखरेखीखाली ठेवण्यात आले होते, असे संजय पठारे, साहाय्यक संचालक, रुबी हॉस्पिटल यांनी स्पष्ट केले.

संबंधित लेख