राष्ट्रवादीने व्यक्त केली थोर महापुरुषांच्या प्रति कृतज्ञता

11 Jun 2018 , 07:06:21 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या १९व्या वर्धापनदिनी महाराष्ट्राच्या जडणघडणीत ज्या महापुरुषांचा, नेत्यांचा सिंहाचा वाटा आहे त्यांच्या फलकांनी पुणे शहर सर्वांचे स्वागत करत आहे. महाराष्ट्रातील थोर महापुरुषांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आला असल्याची माहिती प्रवक्ते अंकुश काकडे यांनी दिली आहे.

दीन-दुबळ्यांचे कैवारी म्हणून उभा महाराष्ट्र ज्यांच्याकडे पाहतो त्या महात्मा फुले यांचे नाव या नगरीला देण्यात आले आहे. मुख्य व्यासपीठाला पश्चिम महाराष्ट्रचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री स्व.आर आर पाटील यांचे नाव देण्यात आले आहे. नगरीच्या मुख्य प्रवेशद्वाराला घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले. तसेच छत्रपती शाहू महाराज, अहिल्यादेवी होळकर, अण्णाभाऊ साठे, मौलाना अब्दुल कलाम आझाद यांचेही नाव ठिकठिकाणच्या प्रवेशद्वारांना दिले आहे. तसेच सरकारच्या अकार्यक्षमतेचे प्रदर्शन करणारे फलकही संपूर्ण शहरात लावण्यात आले आहे.

संबंधित लेख