सर्वांच्या एकत्र ताकदीने येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक भक्कम होईल - जयंत पाटील

11 Jun 2018 , 07:56:48 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा १९ वा वर्धापन दिन रविवारी साजरा करण्यात आला. पुणे येथील पक्ष कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी गेल्या १९-२० वर्षांचा कालखंड इथे उपस्थित असलेल्या जुन्या आणि अनेक मान्यवर नेत्यांच्या डोळ्यांसमोर सहजगत्या येत असेल, असे भावनिक वक्तव्य त्यांनी केले. महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये असा एकमेव पक्ष आहे ज्याने आपल्या स्थापनेनंतर एक महत्त्वाची आणि निर्णायक भूमिका बजावली. आज विसाव्या स्थापना दिवशी पश्चिम महाराष्ट्र हल्लाबोल आंदोलनाची सभाही या ठिकाणी आयोजित केलेली आहे, असे सांगत प्रदेशाध्यक्षांनी आजच्या दिवसाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

मुसळधार पाऊस असला तरी सातारा, सांगली, कोल्हापूरहून कार्यकर्ते आज पुण्यात येत आहेत. अजितदादांनी मोठ्या प्रमाणात कष्ट गेल्या काही दिवसांत पुणे जिल्ह्यात घेतले आहेत. आपल्या सर्वांच्या ताकदीने येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक भक्कम होईल. आपण सगळे योगदान द्याल याबद्दल आमच्या कुणाच्याही मनात शंका नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संबंधित लेख