राष्ट्रवादी काँग्रसेच्या खा. सुप्रिया सुळे यांना संसद रत्न पुरस्कार प्रदान

11 Jun 2018 , 08:44:52 PM

राष्ट्रवादी काँग्रसेच्या खा. सुप्रिया सुळे या संसद रत्न पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत. आय. आय. टी. मद्रास येथे पंतप्रधानांचे माजी सुरक्षा सल्लागार एम. के. नारायणन् आणि माजी निवडणूक आयुक्त टी. एस. कृष्णमुर्ती यांच्या हस्ते सुळे यांनी संसद रत्न पुरस्कार स्वीकारला. प्राईम पॉईंट फाऊंडेशन-प्रिसेन्स ई-मॅगेझिनच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. 

यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना सुळे म्हणाल्या की, “हा पुरस्कार स्वीकारताना विशेष आनंद होत आहे. जनतेने दाखविलेला विश्वास आणि आशीर्वादाच्या बळावर संसदेत जनतेसाठी काम करण्याची संधी मिळाली. हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी सदैव प्रयत्नरत आहे. हा संसदरत्न पुरस्कार माझा मतदारसंघ आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेचा गौरव आहे. या जनतेलाच मी हा पुरस्कार समर्पित करीत आहे.”

संबंधित लेख