राष्ट्रवादी काँग्रेस; दोन दशके विश्वासाची

11 Jun 2018 , 09:32:44 PM

"सर्व जातींच्या आणि धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन भारतीयांची एक जबरदस्त शक्ती निर्माण करण्यासाठी आज पुन्हा एकदा नव्याने महात्मा गांधींचा विचार घेऊन तुम्हा सर्वांच्या साक्षीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशाच्या कानाकोपऱ्यात जाण्यासाठी मार्गस्थ होत आहे.

दिल्लीमध्ये महाराष्ट्राची प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी पराकाष्ठा करण्याची शपथ मी आपणा सर्वांच्या साक्षीने घेतो. नवा इतिहास निर्माण करण्याची ताकद या महाराष्ट्राच्या मातीत आणि तुम्हा सर्वांच्या मनगटात आहे. आणि त्यावर माझा विश्वास आहे."

१० जून १९९९ रोजी पक्षाची स्थापना करताना सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा माननीय पवार साहेबांनी दिलेला शब्द पक्षाच्या आजवरच्या वाटचालीत खरा करुन दाखविला आहे.
१९ वर्षांपूर्वी साहेबांनी शिवाजी पार्क येथे केलेल्या भाषणाचे संदर्भ पेरत त्यावेळचा माहौल खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा चितारलाय सरकारनामा या वृत्त वेबसाइटवर.
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून दिलेला समतेचा वस्तुपाठ हीच खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढील वाटचालीची शिदोरी असेल असे स्पष्टपणे पवारसाहेबांनी नमूद केलं होतं.

ही शिदोरी पाठीशी बांधूनच राष्ट्रवादीने आपली वाटचाल कायम ठेवली व आज हा राष्ट्रीय पक्ष दिमाखात २० व्या वर्षांत पदार्पण करत आहे.

संबंधित लेख