शिस्तबद्धता हीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ओळख

13 Jun 2018 , 08:31:16 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा १९वा वर्धापनदिन पुण्यातील सहकार नगर येथे शिंदे हायस्कूलच्या मैदानात पार पडला. या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते आणि अनेक राष्ट्रवादीप्रेमी उपस्थित होते. गर्दीने संपूर्ण परिसर गच्च भरला होता. मात्र या गर्दीत प्रचंड शिस्तबद्धता होती. परिसर कसा स्वच्छ राहील याची काळजी प्रत्येक जण घेत होतं. स्व. आर. आर. आबांनी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाद्वारे स्वच्छतेचा जो संदेश राज्यभर दिला, त्याच्या अंमलबजावणीची प्रचिती येत होती. त्यामुळेच की काय सोहळ्यानंतरही सहकार नगरमधील हे मैदान पूर्वी होते तसेच साफ आणि स्वच्छ राहिले.

इतकेच नव्हे तर दुसऱ्या दिवशीही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पक्षनेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत: येऊन मैदानाची पाहणी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत शिस्तबद्धतेला किती महत्त्व आहे हे यातून सिद्ध होते.

संबंधित लेख