पिंपरी-चिंचवड हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बालेकिल्ला – संग्राम कोते पाटील

18 Jun 2018 , 09:49:50 PM

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिपरी-चिंचवड येथे प्रचंड विकास केला आहे. अजित पवार यांच्या प्रयत्नांमुळेच पिंपरी-चिंचवड जगाच्या नकाशावर आले, त्यामुळे पिंपरी - चिंचवड हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बालेकिल्ला आहे. शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी या वर्षभरात प्रचंड मेहनत घ्यावी, असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी केले. पक्षाच्या बुथ कमिट्या बांधण्यासाठी शहरात युवकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होते, त्यावेळी ते बोलत होते.

बुथ कमिट्यांबाबत मार्गदर्शन करताना संग्राम कोते पाटील म्हणाले की शहरात लवकरात लवकर बुथ कमिट्या स्थापन करायला हव्या. बुथ कमिट्यांमध्ये किमान १५ युवकांचा समावेश असावा अशी अपेक्षीही त्यांनी व्यक्त केली. या बुथ कमिट्यांचा आढावा खुद्द प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि पक्षनेते अजित पवार घेणार असल्याची माहितीही त्यांनी कार्यकर्त्यांना या मेळाव्यादरम्यान दिली.

या मेळाव्याला शहाराध्यक्ष संजोग वाघेरे, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, माजी आमदार विलास लांडे, नाना काटे, विरोधी पक्षनेते दत्ता साणे, प्रदेश सरचिटणीस विलास काळभोर, आदी पदाधिकारी मोठ्या संख्येन उपस्थित होते.

संबंधित लेख