फिटनेसचे धडे देणाऱ्यांनी आधी रोजगार द्यावा - संग्राम कोते पाटील

21 Jun 2018 , 07:37:18 PM

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासीयांना फिटनेसचे धडे देत आहेत, सेलिब्रिटींना फिटनेस चॅलेंज देत आहे. फिटनेसकडे गांभीर्याने पाहणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणांच्या रोजगाराकडेही गांभीर्याने पाहावे आणि देशातील तरुणांना रोजगार द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी केली.

‘एक बुथ दहा युथ’ या मोहिमेअंतर्गत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी राज्याचा दौरा आखला आहे. त्यासाठी पुण्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा मेळावा आयोजित केले गेला होता. या मेळाव्याला संग्राम कोते पाटील यांनी संबोधित केले.

यावेळी शहराध्यक्ष राकेश कामठे, प्रदेश सरचिटणीस समीर चंदेरे, सुनील गव्हाणे, युवराज बेलदरे आणि पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख