खाते सांभाळता येत नसेल तर मुख्यमंत्र्यांनी चालते व्हावे, नवाब मलिक यांचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

27 Jun 2018 , 08:59:22 PM

राज्यातील पोलिस कर्मचारी, पोलिस कर्मचाऱ्यांची कुटुंबे सुरक्षित नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र पोलिस दलात नेमके काय चालले आहे, मुख्यमंत्री नेमके काय करत आहेत? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. औरंगाबादच्या पोलिस उपायुक्तांवर महिला पोलिसाच्या मुलीने बलात्काराचा आरोप केला आहे. एमपीएससी परीक्षेच्या मार्गदर्शनाच्या बहाण्याने पोलिस उपायुक्तांनी बलात्कार केला, असा खळबळजनक आरोप पोलिस उपायुक्तांवर केला गेला आहे. यावर मलिक यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

पुढे बोलताना मलिक म्हणाले की याआधीही राज्यात पोलिस अधिकारी अश्विनी बिंद्रे यांच्या हत्येचे प्रकरण गाजले होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचा छळ करत हत्या केली होती. इतकेच नव्हे तर अश्विनी बिंद्रे यांच्या शवाची विटंबनाही करण्यात आली होती. या सगळ्या प्रकारांमधून गृह खाते सांभाळणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किती अकार्यक्षम आहेत हे दिसून येते. त्यामुळे खाते सांभाळता येत नसेल तर मुख्यमंत्र्यांनी चालते व्हावे, असे आव्हानही नवाब मलिक यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.

संबंधित लेख