कौशल्य विकास विभागामार्फत ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचे आयोजन

कौशल्य विकास विभागामार्फत ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचे आयोजन – ना. नवाब मलिक

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या संकटकाळात राज्यातील बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी कौशल्य विकास विभागाने पुढाकार घेतला असून सध्याचा लॉकडाऊनचा कालावधी बघता प्रत्यक्ष रोजगार मेळावे घेता येणे शक्य नसल्याने विभागामार्फत आता ऑनलाईन रोजगार मेळावे आयोजित करण्यात येत असल्याची माहिती राज्याचे कौशल्य विकास मंत्री ना. नवाब मलिक यांनी दिली.

या मोहिमेंतर्गत राज्यात आतापर्यंत एकूण १४ ऑनलाईन व्हर्च्युअल रोजगार मेळावे झाले असून त्यास उद्योजक व उमेदवारांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. ऑनलाईन मेळाव्यां मध्येळ एकूण ११५ उद्योगांनी त्यांच्याकडे असलेली १२ हजार ३२२ रिक्तरपदे अधिसूचित केली आहेत. यामध्ये २५ हजार ४७ उमेदवारांनी ऑनलाईन सहभाग घेतला व त्यापैकी १ हजार २११ उमेदवारांची निवड झाली असून इतर उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरु आहे

कौशल्य विकास विभागाने बेरोजगार तरुणांना नोकरी आणि उद्योजकांना कुशल उमेदवार मिळवून देण्याच्या अनुषंगाने तयार केलेल्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाचा प्रभावीपणे वापर करून हे मेळावे घेतले गेले. पुणे, सातारा, औरंगाबाद, नागपूर, सांगली आणि ठाणे येथील जिल्हाम कौशल्य१ विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन कार्यालयांनी प्रत्येकी १ ऑनलाईन रोजगार मेळावा घेतला. नाशिक आणि यवतमाळ येथील कार्यालयांनी प्रत्येकी २ तर उस्मानाबाद मॉडेल करिअर सेंटर यांनी ४ ऑनलाईन रोजगार मेळावे आयोजित केले.

ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांना मिळणार ५०० नवीन रुग्णवाहिका

ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांना मिळणार ५०० नवीन रुग्णवाहिका

ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांना मिळणार ५०० नवीन रुग्णवाहिका
- आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे

राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी शासकीय रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांना ५०० नवीन रुग्णवाहिका पुरविण्यात येणार आहेत. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजित पवार यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात केलेल्या घोषणेची पूर्तता केली असून या नवीन रुग्णवाहिका महिन्याभरात उपलब्ध होतील, अशी माहिती आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांनी दिली. ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेला बळकटी देण्यात येत असून आता नवीन रुग्णवाहिका आल्यावर ग्रामीण व दुर्गम भागातील जनतेला अधिक चांगल्या प्रकारे आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी मदत होणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.  मार्चमध्ये झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ना. अजित पवार यांनी राज्यातील आरोग्य केंद्रातील जुन्या झालेल्या १००० रुग्णवाहिका टप्प्या टप्प्याने बदलून त्याजागी नवीन रुग्णवाहिका देण्याची घोषणा केली होती. यावर्षी ५०० आणि पुढील वर्षी ५०० अशा नवीन रुग्णवाहिका देण्यात येतील, असे त्यांनी जाहीर केले होते. बऱ्याच आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका जुनाट झाल्या आहेत. त्या निर्लेखित करण्यात आल्या आहेत. यावर्षी ५०० नवीन रुग्णवाहिकांसाठी ८९ कोटी ४८ लाख अंदाजित खर्चासाठी प्रशासकीय मान्यता नुकतीच देण्यात आली असून त्यानुसार एक महिन्याच्या कालावधीत नवीन रुग्णवाहिका उपलब्ध होणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. या ५०० नवीन रुग्णवाहिका २५३ प्राथमिक आरोग्य केंद्र, १३७ ग्रामीण रुग्णालये, १०६ जिल्हा व उप जिल्हा तसेच स्त्री रुग्णालये आणि ४ प्रादेशिक मनोरुग्णालये यांना देण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

खासगी रुग्णालयांकडून होणारी अवाजवी शुल्क आकारणी रोखण्यासाठी राज्यात भरारी पथके नेमण्याचे निर्देश

राज्यात कोरोनाबाधितांच्या उपचारांसाठी खासगी रुग्णालये आणि रुग्णवाहिकांनी अवाजवी शुल्क आकारणी करू नये, असे निर्देश राज्य शासनाने वेळोवेळी दिले आहेत. या निर्देशांची अंमलबजावणी योग्यप्रकारे होत आहे की नाही याच्या तपासणीसाठी राज्यात भरारी पथके नेमण्यात आली आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज मुंबईत दिली. यासंदर्भात आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांना पत्र पाठविले असून तपासणी अहवाल तीन दिवसात शासनाला सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.कोरोनाबाधित रुग्णांना वाजवी दरात उपचार मिळावेत यासाठी राज्य शासनाने २१ मे २०२० रोजी काढलेल्या अधिसूचनेद्वारे खासगी रुग्णालयांना कमाल दर मर्यादा निश्चित करून दिली आहे. त्याचबरोबर राज्यातील सर्व नागरिकांना महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना लागू करण्यात आली असून खासगी वाहने आणि रुग्णवाहिका अधिग्रहीत करून त्यांचे कमाल दरही निश्चित केले आहेत. तसेच खासगी रुग्णालयांनी खाटा उपलब्ध करून देण्याबाबतच्या अधिसूचनेच्या प्रभावी अमंलबजावणीचेही निर्देश देण्यात आले आहेत. असे असताना अद्यापही खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांकडून जास्तीचे शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याची दखल घेऊन राज्यातील जनतेच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयांची प्रभावी आणि काटोकोरपणे अंमलबजावणी व्हावी म्हणून जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी तसेच विभागीय आयुक्तांनी देखील त्यांच्या स्तरावर भरारी पथक नेमण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत.

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कोरोना काळात विद्यार्थ्यांसाठी आक्रमक विद्यार्थ्यांसाठी राबवणार कोविड शिक्षण शुल्कनीती अभियान

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कोरोना काळात विद्यार्थ्यांसाठी आक्रमक
विद्यार्थ्यांसाठी राबवणार कोविड शिक्षण शुल्कनीती अभियान

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस पूर्णपणे बंद आहेत. हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी काही ऑनलाईन वर्ग सुरू करण्यात आले आहेत. मात्र, काही ठिकाणी शाळा, महाविद्यालये पालकांकडून अधिकचे शैक्षणिक शुल्क सक्तीने आकारण्यात येत आहे, तर काहींनी पालक आणि विद्यार्थ्यांकडे शैक्षणिक शुल्कासाठी तगादा लावला आहे. हे लक्षात घेऊन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे आगामी काळात विद्यार्थ्यांसाठी कोविड शिक्षण शुल्कनीती अभियान ही मोहीम राबविण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या आर्थिक संकटाच्या परिस्थितीत शाळा, महाविद्यालये,क्लासेस यांनी शुल्क निश्चिती आणि शुल्क आकारणीबाबत निश्चित धोरण ठरवणे गरजेचे आहे, अशी भूमिका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांनी मांडली आहे.

अशी असेल शुल्कनीती
१. शासनाने सूचित केल्याप्रमाणे कोणत्याही शैक्षणिक संस्थेने शुल्कवाढ करू नये.
२. पालक आणि विद्यार्थी यांच्यासोबत चर्चा करून शैक्षणिक संस्थांनी शक्य असेल तेवढे शुल्क कमी करावे.
३. निश्चित केलेले शुल्क टप्प्याटप्प्याने भरण्यासाठी आराखडा आखावा व त्यानुसार अंमलबजावणी करावी.
४. कोणत्याही परिस्थितीत पालक किंवा विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यासाठी सक्ती करू नये. त्याचबरोबर केवळ शुल्क न भरल्याचे कारण दाखवत कोणत्याही विद्यार्थ्यांला कुठल्याही प्रकारच्या शैक्षणिक सुविधेपासून वंचित ठेवू नये.
वरील शुल्कनीतीची अंमलबजावणी करण्यासाठी येणाऱ्या काळात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या सर्व विभागांचे नवनिर्वाचित विभागीय प्रमुख तसेच सर्व जिल्हा, शहर, तालुका अध्यक्ष व पदाधिकारी शाळा, महाविद्यालये व क्लासेस यांना प्रत्यक्ष भेट देऊन शिक्षण शुल्कनीती समजावून सांगणार आहेत. विद्यार्थ्यांना वा पालकांना शैक्षणिक संस्थांकडून नाहक त्रास झाल्यास विद्यार्थी काँग्रेस त्या त्या भागातील पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आक्रमक भूमिका घेईल, अशी भूमिकाही प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांनी मांडली आहे.

आजी-माजी सैनिकांना ग्रामपंचायत मालमत्ता करातून माफी

आजी-माजी सैनिकांना ग्रामपंचायत मालमत्ता करातून माफी

ग्रामविकास विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय

राज्यातील आजी आणि माजी सैनिकांना ग्रामपंचायतीच्या मालमत्ता करातून माफी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ यांनी केली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय ग्रामविकास विभागामार्फत निर्गमित करण्यात आला असून देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या राज्यातील सर्व आजी-माजी सैनिकांसाठी हा निर्णय लागू करण्यात येत असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

ग्रामीण क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या अनेक आजी, माजी सैनिकांनी देशासाठी प्राणाची बाजी लावून निःस्वार्थपणे देशाचे संरक्षण केले आहे. त्यांची देशसेवा विचारात घेता सर्व आजी, माजी सैनिकांना भावनिक दिलासा देणे व त्यांचे मनोबल उंचावून त्यांना उचित सन्मान देण्याच्या अनुषंगाने शासनाने हा निर्णय घेतला असल्याचे हसन मुश्रीफ म्हणाले. अशा करमाफीस पात्र ठरणाच्या व्यक्तींनी जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.

रेशनचा काळाबाजार खपवून घेतला जाणार नाही

रेशनचा काळाबाजार खपवून घेतला जाणार नाही – ना. छगन भुजबळ

राज्यात कुठेही रेशनचा काळाबाजार होत असेल तर संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. राज्यात कुठेही रेशनचा काळाबाजार खपवून घेतला जाणार नाही, कुणीही कारवाई पासून वाचणार नाही, असा इशारा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना. छगन भुजबळ यांनी दिला आहे. आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान श्री. भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली.

नागरिकांनी दीपावली आनंदात साजरी करावी, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फटाके वाजवून प्रदूषण होणार नाही याची नागरिकांनी काळजी घ्यावी. फटाक्यांमुळे वायू प्रदूषण होऊन श्वसनाचे आजार होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी यंदा फटाके वाजवण्यावर नियंत्रण ठेवावे, असे आवाहन त्यांनी यावेळी नागरिकांना केले.

हिवाळी अधिवेशनाबाबत विचारलेल्या प्रश्नाबाबत ते म्हणाले की, "नागपूर येथील आमदार निवास येथे कोविड सेंटर सुरू आहे. तसेच कोविड विलागीकरण कक्ष तयार करण्यात आलेले आहेत. त्यामुळे नागपूरला अधिवेशन नको अशी आमदारांची मागणी आहे. आमदारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विरोधी पक्ष नेते व कामकाज सल्लागार समितीचे सदस्य याबाबत लवकरच योग्य तो निर्णय घेतील."

अजितदादांचा दिवाळी धमाका

कोरोनामुक्त झाल्यानंतर अजितदादांचा दिवाळी धमाका

एस.टी. कर्मचाऱ्यांसाठी १ हजार कोटी रुपयांचे पॅकेज

महाराष्ट्र राज्याचे कार्यतत्पर उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनाही कोरोनाची लागण झाली होती. अजितदादांनी कोरोनावर मात करून पुन्हा एकदा ॲक्शन मोडमध्ये उडी घेतली आहे. दादांनी राज्यातील एस.टी कर्मचाऱ्यांना दिवाळीची गोड भेट दिली आहे. एस. टी कर्मचाऱ्यांना पुढील सहा महिन्यांसाठी १ हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले. तसेच ऑक्टोबर महिन्यापर्यंतचे वेतन दिवाळीपूर्वी देण्याचा ठाम निर्णय उपमुख्यमंत्र्यांनी कामात पुन्हा रुजू झाल्यानंतर घेतला आहे. ऐन दिवाळीच्या वेळी राज्यातील एस. टी कर्मचारी बांधवांना हे पॅकेज देऊन अजितदादांनी हा दिवाळीचा धमाका उडवून दिला आहे.

MaulanaAzad

भारतरत्न मौलाना अबुल कलाम यांच्या जयंती दिन 'राष्ट्रीय शिक्षण दिन' म्हणून साजरा केला जातो. देशातील शिक्षणव्यवस्थेचा पाया अबुल कलाम यांनी घातला. ते हिंदू-मुस्लीम एकतेचे समर्थक होते. भारतीय मुस्लीम विद्वानांमध्ये त्यांची गणना होते. जयंती दिनी त्यांना विनम्र अभिवादन !

भगवान बिरसा मुंडा

आदिवासींच्या उन्नतीसाठी बलिदान देणारे, पाणी, जंगल व भूमीसाठी संघर्षरत, आदिवासी समाजक्रांतीचे जनक व स्वातंत्र्यसेनानी भगवान बिरसा मुंडा यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन !

MLA Jitendra Awhad addresses press in Thane

Shivsena should change their symbol from bow and arrow to a man holding a coconut in hands, mocked MLA Jitendra Awhad while addressing a press conference in Thane. He was speaking about the incidence where a candidate of Shivsena threw coconut that was brought to break for campaigning, at his wife which injured her. This kind of behavior is disgraceful. Shivsena should immediately cancel his candidacy, demanded Awhad. How would those who fail to respect their own wife can respect other women and protect them, he questioned.

Jitendra Awhad took a dig at ruling Shivsena in a press conference held ahead of TMC elections. Shivsena has wasted 3.5 thousand crore rupees of Thanekars. Their lack of management has caused a water shortage in Thane in the month of February only. Shivsena lacks vision; they have not done anything for Thane in the last 25 years, Awhad said. He further claimed that Sena has rather taken credit for developments done by NCP. He also informed that for ward no 24 K Jitendra Patil will be contesting from NCP for TMC elections.

While speaking here NCP Thane City President Anand Paranjpe criticized that Shivsena’s Vachannama is mere a BolBacchanNama. They have ruined 3.5 thousand crore rupees of Thanekars in the last 25 years; hence, Thanekars should not fall for their any fake promises in upcoming elections, Paranjpe appealed.