Only party connected to 80 lakh students is NCP

Numerous students are connected to the Nationalist Congress Party through Nationalist Students Congress. NSC has tried to connect with each student of the state. Their campaign ‘Mahavidyalay Tithe Shakha’ (Branch at each college) has been very successful and made NCP the only party having 80 lakh students connected to it. NSC protests for the legitimate rights of students. The support from students makes the agitations stronger. The scholarships of 14 lakh students in the state are pending. NSC protested at every divisional social welfare office and made the scholarships available. NSC strongly supported six lakh students who appeared for the NEET exam for medical entrance. These students found some solace in an hour of need through NCP. In this way, a bond of trust has been made between students and NCP and a huge number of students are looking up at the Nationalist Congress Party.

Lok Sabha by-election reflects BJP’s inefficiency – Nawab Malik

Chief Spokesperson, Nawab Malik interacted with journalists on the topic of the Lok Sabha by-elections. The victory of the Nationalist Congress Party in Bhandara-Gondiya was celebrated. Prior to press conference, he paid tribute to Pandurang Phundkar, the Minister of Agriculture for his contribution in the state’s political and social sectors.

 

Nawab Malik thanked the people who voted for NCP. In Bhandara-Gondia constituency, Nana Patole resigned from the position of Member of Parliament. He had given resignation by giving reason of insufficiency of the government. Government is unable to provide welfare, representative are not given right to express, he said. The results of the four Lok Sabha seats and ten assembly seats in the country were announced. BJP has lost three seats except Palghar. Malik said that BJP did not even win its own seats.

 

BJP got the benefit of divided votes among parties in Palghar. NCP was urging Congress to provide support to Bahujan Vikas Aaghadi. If it would have happened then the results would have different. BJP won this election by misusing power, spending huge money, using government machinery. The same tactics were used in Bhandara- Gondia as well. They violate the code of conduct. NCP workers protested and complained to the Election Commission.  Many EVM machines were out of function. So the election was conducted again at 49 places. People have doubts about EVM machines. Elections on the ballot paper are being used in many developing countries. Malik said that the Election Commission should think about this.

 

If ShivSena and the BJP fight together for the upcoming Lok Sabha and Vidhan Sabha elections, then all other likeminded parties will come together and pull BJP out of power in the elections of 2019.

साडेपाच लाख शेतकरी सरकारी मदतीपासून वंचीत – धनंजय मुंडे

राज्यात आरक्षणासोबत दुष्काळाचा विषय गंभीर बनला आहे. आपल्या मागण्यांसाठी कित्येक किलोमीटर पायपीट करत माणसे आझाद मैदानावर आली आहेत. राज्यात अशी अवस्था याआधी कधीच झालेली नव्हती. ६ महिन्यांपूर्वी दिलेले शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी पाळले नाही, शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे, असे वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले.

साडेपाच लाख शेतकरी सरकारी मदतीपासून वंचीत आहेत. आपला आक्रोश मांडण्यासाठी हा शेतकरी मोर्चा निघाला आहे, तो या सरकारला शेवटचा धडा देण्यासाठी येणार आहे,असे मुंडे म्हणाले.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आतापर्यंत ४१ जणांनी आपले जीव गमावले. त्यांना दहा लाख व शासकीय नोकरी देण्याचे आश्वासन या सरकरने दिले होते, त्याची परिपूर्तता झाली का याचे उत्तर सरकारने द्यावे, असे मुंडे परिषदेत म्हणाले.

विधान परिषदेत मागासवर्गीय आयोगाचा अहवाल पटलावर का घेतला जात नाही? त्याचबरोबर धनगर आरक्षणाचा टीसने दिलेला अहवालही सदनात मांडला यावा अशी मागणी त्यांनी सभागृहात केली.

सामाजिक बांधिलकीचा जपूया वारसा देऊन निसर्ग चक्रीवादळ बाधितांना मदतीचा हात..

निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणातील रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील शेतीचे, घरांचे, फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकरी, कोळी बांधव, कष्टकरी, तसेच छोट्या उद्योजक नुकसामानुळे हवालदिल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्तांना वस्तू, अन्नधान्य तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी मदतीचा हात देण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच जनतेला करण्यात येत आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी हे आवाहन केले आहे.

राज्यशासनातर्फे १०० कोटींची मदत याआधीच कोकणातील नुकसानग्रस्त भागासाठी जाहीर करण्यात आली आहे. तसेच या भागात मोफत धान्य व केरोसिनचे वाटपही करण्यात येत आहे. सर्व नुकसानाचे पंचनामे पूर्ण झाल्यावर शासनातर्फे अधिक मदतही जाहीर करण्यात येईल. या मदतकार्यात आपलाही खारीचा वाटा उचलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरसावला आहे. पक्षाने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत कोणत्याही नैसर्गिक आपत्तीत लोकांच्या मदतीला धावून जाण्याची भूमिका घेतली आहे. आताही निसर्ग चक्रीवादळ बाधितांच्या सहकार्यासाठी सर्वांना पुढे येण्याचे आवाहन पक्षातर्फे करण्यात येत आहे.

पोलिस शिपाई भरतीच्या निर्णयाने शहरी व ग्रामीण तरुणांना नोकरीची संधी,राज्यात पोलिस शिपाई संवर्गातील १० हजार जागा भरणार – उपमुख्यमंत्री ना. अजित पवार

पोलिस शिपाई भरतीच्या निर्णयाने शहरी ग्रामीण तरुणांना नोकरीची संधी

राज्यात पोलिस शिपाई संवर्गातील १० हजार जागा भरणारउपमुख्यमंत्री ना. अजित पवार

राज्यातील कायदासुव्यवस्था भक्कम करण्याबरोबरच पोलिस दलावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी राज्यातील पोलिस शिपाई संवर्गात दहा हजार तरुणांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याचा फायदा शहरी ग्रामीण तरुणांना होईल, त्यांना पोलिस दलात सेवेची संधी मिळेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी आज दिली. नागपूरमधील काटोल येथे राज्य राखीव पोलिस दलाच्या महिला बटालियनची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात आज महत्त्वाची बैठक झाली. बैठकीला गृहमंत्री ना. अनिल देशमुख यांच्यासह गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक, गृह विभागाचे विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता, महसुल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस. श्रीनिवास, एसआरपीएफच्या अपर पोलिस महासंचालक अर्चना त्यागी आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत गृह विभागाकडून पोलिस शिपाई पदाच्या हजार जागा भरण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. परंतु उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी त्यात आणखी हजार जागा वाढवून एकूण १० हजार पोलिस शिपाई भरती करण्याचे ही भरती प्रक्रिया येत्या वर्षभरात पूर्ण करण्याचे निर्देश दिले. कोरोनासंकटाच्या पार्श्वभूमीवर ही भरती प्रक्रिया विनाअडथळा यशस्वीपणे कशी राबवता येईल, याचा विचार करुन सर्वंकष प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत तातडीने मांडण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले. मंत्रिमंडळ मंजूरीनंतर भरती प्रक्रियेची कार्यवाही वेग घेईल

याबरोबरच नागपूरच्या काटोल येथे राज्य राखीव पोलिस दलाची महिला बटालियन स्थापन करण्याच्या निर्णयावरही आज उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. या बटालियनसाठी १३८४ पदे निर्माण करण्यात येणार असून प्रत्येक टप्प्यात ४६१ प्रमाणे टप्प्यात ही पदे भरण्यात येणार आहेत. यातूनही शहरी ग्रामीण युवतींना पोलिस सेवेची संधी मिळणार असल्याचेही उपमुख्यमंत्री म्हणाले.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी १ हजार ३०६ कोटींचा निधी वितरीत करण्यास मान्यता

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत सन २०२०-२१ साठी ७ हजार कोटी रुपये निधी अर्थसंकल्पित करण्यात आला आहे. या निधीतून यापूर्वी वितरीत केलेला निधी वगळता १ हजार ३०६ कोटी रूपये इतका निधी वितरीत करण्यास आज शासनाने मान्यता दिल्याची माहिती सहकार मंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी दिली.

दि. १ एप्रिल, २०१५ ते दि. ३१ मार्च, २०१९ पर्यंतच्या कालावधीसाठी अल्पमुदतीचे पीक कर्ज घेतलेल्या, तसेच या कालावधीत अल्पमुदतीच्या पीक कर्जाचे पुनर्गठन/फेरपुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना’ जाहीर करण्यात आली होती. या योजनेची अंमलबजावणी सुरू असताना देशासह राज्यात कोविड-१९ चे महासंकट आले. त्यामुळे राज्यामध्ये लॉकडाऊन जाहीर झाला. त्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये काही अडचणी निर्माण झाल्या आणि तिसऱ्या यादीतील पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळण्यास उशीर झाला. मात्र आता योजनेच्या अंमलबजावणीला गती देण्यात आली असून ज्या शेतकऱ्यांची आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे.

ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांना मिळणार ५०० नवीन रुग्णवाहिका – आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे

राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी शासकीय रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांना ५०० नवीन रुग्णवाहिका पुरविण्यात येणार आहेत. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजित पवार यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात केलेल्या घोषणेची पूर्तता केली असून या नवीन रुग्णवाहिका महिन्याभरात उपलब्ध होतील, अशी माहिती आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांनी दिली. ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेला बळकटी देण्यात येत असून आता नवीन रुग्णवाहिका आल्यावर ग्रामीण व दुर्गम भागातील जनतेला अधिक चांगल्या प्रकारे आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी मदत होणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मार्चमध्ये झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ना. अजित पवार यांनी राज्यातील आरोग्य केंद्रातील जुन्या झालेल्या १००० रुग्णवाहिका टप्प्या टप्प्याने बदलून त्याजागी नवीन रुग्णवाहिका देण्याची घोषणा केली होती. यावर्षी ५०० आणि पुढील वर्षी ५०० अशा नवीन रुग्णवाहिका देण्यात येतील, असे त्यांनी जाहीर केले होते. बऱ्याच आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका जुनाट झाल्या आहेत. त्या निर्लेखित करण्यात आल्या आहेत. यावर्षी ५०० नवीन रुग्णवाहिकांसाठी ८९ कोटी ४८ लाख अंदाजित खर्चासाठी प्रशासकीय मान्यता नुकतीच देण्यात आली असून त्यानुसार एक महिन्याच्या कालावधीत नवीन रुग्णवाहिका उपलब्ध होणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. या ५०० नवीन रुग्णवाहिका २५३ प्राथमिक आरोग्य केंद्र, १३७ ग्रामीण रुग्णालये, १०६ जिल्हा व उप जिल्हा तसेच स्त्री रुग्णालये आणि ४ प्रादेशिक मनोरुग्णालये यांना देण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.