नागपुरात १७ जुलैपासून संविधान बचाव मोहीम

१७ जुलै

नागपूर

राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस करणार मनूस्मृती, इव्हिमचे प्रतिकात्मक दहन

राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्यावतीने संविधान बचाव, देश बचाव मोहिमेची नागपूर येथे १७ जुलै, २०१८ पासून मा. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात होत आहे. नागपूर येथे होणाऱ्या कार्यक्रमाला विदर्भातील महिलांची मोठया प्रमाणात उपस्थिती राहणार असून यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नियोजनासाठी राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष फौझिया खान बैठक घेत आहेत. या सरकारच्या काळात संविधानावर घाला घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशात महिला, अनुसूचित जाती, अल्पसंख्यांक सुरक्षित नाहीत. देशाचे भगवेकरण केले जात असल्याचा आरोप त्यांनी भाजपवर केला. संविधानाला डावलून सर्वसामान्यांचे अधिकार संपुष्टात आणण्याचा सरकारचा डाव आहे, हा कुटील डाव हाणून पडण्याचा निर्णय राष्ट्रवादीच्या महिलांनी घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

सरकार लोकशाही विरुद्ध वातावरण तयार करत आहे. न्याय मिळण्यासाठी लोकं रस्त्यावर उतरत आहे. संविधान बदलण्याची भाषा करणार्यांन वटणीवर आणण्यासाठी महिला आघाडीने पुढाकार घेतला असून १७ जुलैला मनुस्मृती आणि इव्हिमचे प्रतीकात्मक दहन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आ. विद्या चव्हाण, माजी आ. सुरेश देशमुख, राजू तिमांडे, किशोर माथनकर, सुधीर कोठारी, सुरेखा ठाकरे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.