खासदार सुप्रिया सुळे शुक्रवार, १० फेब्रुवारी रोजी, सकाळी १० वाजता, फेसबुकवर लाइव्ह

१० फेब्रुवारी २०१७ ,सकाळी १० वाजता

मुंबई


राज्यातील महापालिका, जि.प. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध प्रश्न, सध्याच्या राजकारणाने घेतलेली वळणं आणि अनेक नागरी व ग्रामीण मुद्दे याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे उद्या शुक्रवार, १० फेब्रुवारी, सकाळी १० वाजता, फेसबुक लाईव्हद्वारे लोकांशी संवाद साधणार आहेत. राज्यातील विविध प्रश्नांवर फेसबुक लाईव्हच्या माध्यामातून नेटीझन्सना चर्चा करता येणार आहे. सुप्रियाताईंना तुम्हाला एखादा प्रश्न विचारावयाचा असल्यास आपले प्रश्न तुम्ही आजच कॉमेंटमध्ये पाठवू शकता.