शेतकरी कर्जमाफीसाठी विरोधकांची संघर्षयात्रा

बुधवार,दि.२९ मार्च ते मंगळवार,दि.४ एप्रिल २०१७

महाराष्ट्र

शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे, या मागणीसाठी विरोधी पक्षांतर्फे आयोजित करण्यात आलेल्या संघर्षयात्रेला आजपासून सुरूवात होत आहे. शेतकरी कर्जमाफीची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसतर्फे विधिमंडळ सभागृहात सातत्याने लावून धरली आहे. याआधीच्या अधिवेशनांमध्येही कर्जमाफीच्या मागणीवर विरोधक ठाम राहिले, मात्र तरीही सरकार याबाबत उपाययोजना करत नसल्याने शेतकऱ्यांचा संघर्ष हा आता महाराष्ट्रातील जिल्ह्याजिल्ह्यात लढला जाणार आहे. ४ एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या संघर्षयात्रेची सुरूवात आज चंद्रपूर जिल्ह्यातून होत आहे. शेतकऱ्यांकडे सरकारचे होणारे अक्षम्य दुर्लक्ष कदापीही सहन केले जाणार नाही, हाच संदेश या संघर्षयात्रेतून दिला जाणार आहे.