मंगळवारपासून संघर्षयात्रेच्या तिसऱ्या टप्प्यास सुरूवात

25 April 2017

Kolhapur, Sangli, Satara

शेतकरी कर्जमाफीसाठी विरोधी पक्षांनी चांद्यापासून बांद्यापर्यंत काढलेल्या संयुक्त संघर्षयात्रेच्या तिसऱ्या टप्प्यास उद्या, मंगळवार दि. २५ एप्रिल २०१७ पासून सुरूवात होत आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांमध्ये संघर्षयात्रा यावेळी पोहोचणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेससह इतर विरोधी पक्ष शेतकरी कर्जमाफीच्या मागणीवर ठाम असून यापुढे 'याचना नही रण होगा, संघर्ष बडा भीषण होगा', असा इशारा सत्ताधाऱ्यांना आधीच देण्यात आला आहे. त्यामुळे संघर्षयात्रारूपी हे आंदोलन तिसऱ्या टप्प्यात अधिक आक्रम स्वरुप धारण करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.