भीमा कोरेगाव किंवा एल्गार प्रकरणाची ज्यापद्धतीने गैरवापर झाला आहे त्याची चौकशी व्हावी

भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषदेचा तपास NIA कडे दिला तो केंद्राचा अधिकार आहे. परंतु भीमा कोरेगाव किंवा एल्गार याची चौकशी व्हावी ही आमची मागणी नाही. तर पोलिस दलाचा ज्यापद्धतीने गैरवापर झाला आहे त्याची चौकशी व्हायला हवी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केली.

या प्रकरणाचा चौकशी करण्याचा अधिकार राज्य सरकारलाही आहे. यामध्ये पोलिस दलातील पुणे पोलिस यांनी जो तपास केला. त्यामुळे महाराष्ट्र पोलिस दलाच्या लौकिकाला धक्का बसला आहे. त्यामुळे या प्रकरणात सहभागी असलेल्या महाराष्ट्र पोलिस आणि पुणे पोलिसांची चौकशी करण्यात यावी अशी मागणीही शरद पवार यांनी केली आहे.

या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील उपस्थित होते.